Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या महासभेला देवेंद्र फडणवीसांचा 'करारा' जबाब

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल झालेल्या सभेनंतर फडणवीसांची "उत्तरसभा' आज मुंबईत पार पडली.

दैनिक गोमन्तक

शिवसेनेच्या 14 मे रोजीच्या सभेनंतर आज 15 मे रोजी मुंबईत भाजपची उत्तर सभा पार पडली. यावेळी उत्तर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने या उत्तर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बुस्टर सभा घेतली होती. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांची तोफ धडाडणार आहे. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी करारा जबाब दिला आहे. (BJP Leader Devendra Fadnavis Sabha News)

छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन करून फडणवीसांनी भाषणाला सुरूवात केली. तसेच भाषणाला सुरुवात करताच फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाना साधत म्हटले की, 'काल कौरवांची सभा झाली आणि पांडवांची सभा होत आहे. तर कालची उद्धव ठाकरेंची सभा ही लाफ्टर सभा झाली, आणि कालची लाफ्टर सभा अजून संपलीच नाही'. दाऊदचे मित्र आजही मंत्रीमंडळात आहेत, आणि कालच्या भाषणात नवे मुद्दे येतील अशी आम्हाला आशा होती परंतु शेवटपर्यंतती लाफ्टर सभाच होती. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा पठण करणे हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार आहे का? संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या समाधीवर ओवैसी माथा टेकवण्यासाठी गेला होता' असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

रामजन्मभूमीच्या आंदोलनात तुम्ही नव्हता हे म्हटलं तर तुम्हांला मिरची लागली. उद्धवजी 1992 साली नगरसेवक झाले. जुलैमध्ये वकिल झालो आणि डिसेंबरला नगरसेवक म्हणून मी बाबरी पडण्यासाठी गेलो होतो, याचा मला अभिमान आहे. आज माझे आज वजन 102 किलो आहे, आणि बाबरीवेळी माझे वजन 128 किलो एवढे होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही.

तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत येणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण सध्या या देशात सध्या एकच वाघ आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. बोलायला काही मुद्दे नसले, तर मुंबईला तोडण्याचा मुद्दा शिवसेना नेहमी काढत असते. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बापही वेगळी करू शकणार नाही. मुंबई आम्हाला महाराष्ट्रातून नाही तर भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे, मुंबई आणि महाराष्ट्राचा एकच बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT