केतकी चितळेच्या पोस्टवरुवन देहू संस्थान आक्रमक

कायदेशीर कारवाईसाठी देहूरोड पोलीसांना दिलं पत्र
Ketaki Chitale, Dehu Sansthan
Ketaki Chitale, Dehu SansthanDainik Gomantak
Published on
Updated on

केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तीच्यावर मुंबई पोलीसांनी कारवाई केली असली तरी तीच्या अडचणीत अजुनही वाढ होण्याची शक्यता आहे. कारण देहू संस्थानने पोलीसांना पत्र दिलं आहे या पत्रात म्हटलं आहे की, पोष्ट केलेल्या लिखाणात 'तुका म्हणे' हा शब्द वापरला असून ती संत तुकारामांची नाम मुद्रा आहे, देशातील कोणत्याही संताच्या नावांचा वापर अशा प्रकारे होऊ नये. संतांच्या नावाचा चुकीचा वापर केल्याने तीच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

Ketaki Chitale, Dehu Sansthan
लोकायुक्त कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा - अण्णा हजारे

अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या पोस्टनतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. ठाणे पोलिसांनी काल केतकी चितळेला अटक केली होती. आज ठाणे न्यायलयासमोर तिला हजर केले असता न्यायालयाने तिला १८ तारेखपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.राज्यात अनेक ठिकाणी चितळेवरती गुन्हा दाखल झाले आहेत. पुणे, अमरावती, ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

Ketaki Chitale, Dehu Sansthan
आता BKC मैदानावर म्हणणार हनुमान चालिसा : नवनीत राणांचे उद्धव ठाकरेंना नवे आव्हान

पोस्ट डिलीट करण्यास केतकीने दिला नकार

तसेच केतकीला आज न्यायालयात हजर केले असता आपण केलेली पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर एखाद्या विरोधात बोलण्याचे आणि लिहिण्याचे मला स्वातंत्र्य आहे असेही ती म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे होणार काय याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

काय म्हणाली होती केतकी चितळे शरद पवार यांच्याबद्दल

तुका म्हणे पवारा। नको उडवू तोंडाचा फवारा ॥

ऐंशी झाले आता उरक वाट पहातो नरक ॥

सगळे पडले उरले सुळे सतरा वेळा लाळ गळे ॥

समर्थांचे काढतो माप। ते तर तुझ्या बापाचेही बाप ॥

ब्राह्मणांचा तुला मत्सर । कोणरे तू ? तू तर मच्छर ॥

भरला तुझा पापघडा । गप नाही तर होईल राडा ॥

खाऊन फुकटचं घबाड । वाकडं झालं तुझं थोबाड ॥

याला ओरबाड त्याला ओरबाड तू तर लबाडांचा लबाड ॥

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com