deities for naming to bars and liquor stores banned changing deadline 30 june Dainik Gomantak
महाराष्ट्र

दारूची दुकाने, बार यांना देवी-देवता, महापुरूषांची नावे ठेवण्यास बंदी

राज्याच्या गृहविभागाने काढला आदेश

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील दारूच्या दुकानांना देवी-देवतांची आणि महापुरुषांची नावे देण्यावर बंदी घातली आहे. देवी-देवतांची किंवा महापुरुषांची किंवा ऐतिहासिक किल्ल्यांची नावे असलेल्या अशा दारूच्या दुकानांना नाव बदलण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दारू दुकाने, बार यांना देवता किंवा महापुरुषांचे नाव देण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. याबाबत काही सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता राज्याच्या गृहविभागाने (Home Department) आदेश काढून बंदी घातली आहे.

राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे (History) साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांबाबत तसेच महापुरुषांबाबत प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असल्याचे आदेशात म्हटले आहे. अशा परिस्थितीत देवदेवतांची, महापुरुषांची, गडकिल्ल्यांची नावे वापरून दारूची दुकाने, बार सुरू करून या देवतांची, महापुरुषांची, ऐतिहासिक वास्तूंची प्रतिष्ठा पणाला लागते. त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक भावनाही दुखावल्या जातात. त्यामुळे सामाजिक वातावरणही दूषित होते.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशात काय आहे?

महाराष्ट्र सरकारने (maharashtra-government) दिलेल्या आदेशात राज्यातील गड-किल्ले आणि महापुरुषांसह सर्वांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे आणि सामाजिक सलोखा राखणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात ज्याठिकाणी कोणत्याही प्रकारची दारू विकली जाते, अशा ठिकाणांना कोणत्याही धार्मिक चिन्हे, देवी-देवता, महापुरुष, ऐतिहासिक, प्रतिष्ठित व्यक्तींचे नाव देण्यावर बंदी घालण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Pension Hike 2026: पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग ठरणार वरदान, 67 टक्के पेन्शन आणि 50 टक्के फॅमिली पेन्शनची जोरदार मागणी; जाणून घ्या

Indian Cricketer Viral Chat: शर्टलेस फोटो अन् खासगी चॅट व्हायरल! टीम इंडियाचा खेळाडू चर्चेत; क्रिकेट विश्वात खळबळ

39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

IND vs NZ ODI LIVE Streaming: मिशन न्यूझीलंड! रोहित- विराट मैदानात उतरणार! वनडे मालिकेचा थरार कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

Karapur Sarvan Illegal Constructions: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरुन कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा तापली, ग्रामस्थांच्या आरोपांमुळे गदारोळ

SCROLL FOR NEXT