Eknath Shinde  Twitter/ @ANI
महाराष्ट्र

Dussehra Rally: 'सत्तेसाठी तुम्ही बापाबरोबर गद्दारी केली...,' एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde Dussehra Rally: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच होणारा दसरा मेळावा एकदम जोरदार होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray: शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच होणारा दसरा मेळावा एकदम जोरदार होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. ठाकरे गटाकडून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे हे प्रमुख वक्ते असल्याचे सांगण्यात आले होते. तर दुसरीकडे, शिंदे गटाकडून राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आणि सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील वक्ते असल्याचे सांगण्यात आले होते. यंदाच्या दसरा मेळाव्यावर आपल्या भाषणाची छाप कोण पाडणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते.

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, 'विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना असा अभूतपूर्व दसरा मेळावा पहिल्यांदाच होत आहे. दसरा मेळाव्यासाठी आज अफाट जनसागर इथे उसळला आहे. खरी शिवसेना कुठेयं? खरा बाळासाहेंबाचा वारसदार कुठेयं? असा प्रश्न आता महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला यापुढे पडणार नाही. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं पण काय साध्य केलं.'

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, 'सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिली. बाळासाहेबांचे विचार राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या दावणीला तुम्ही बांधले. आज खऱ्या अर्थाने शिवसैनिक आमच्याबरोबर आहे. जर आम्ही बेईमानी केली असती तर आज एवढा मोठा जनसागर उसळला नसता.'

एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, 'बाळासाहेबांचे विचार आज आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. वारसा हा विचारांचा असतो आणि तो खऱ्या अर्थाने जपायला हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक कोण आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. गद्दारी झालीय पण ती 2019 मध्ये झाली. ज्या मतदार राजाने भाजप-शिवसेना (Shiv Sena) युतीला पाठिंबा दिला होता, त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थाने गद्दारी झालीय. आम्ही गद्दारी नाही तर 'गदर' (क्रांती) केला आहे. सत्तेसाठी उध्दव ठाकरेंनी आपल्याच बापाबरोबर गद्दारी केलीय.'

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, 'राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं सांगितलं होतं, पण पुन्हा आल्यानंतर उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं. मात्र, आता राज्यात कायद्याचा दुरुपयोग होत चालला आहे. सूड उगवण्यासाठी राजकीय नेत्यांना धमकावलं जात आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्वाच्या नावाखाली डोक्यावरचं लोणी खाणारी ही भाजपची जात आहे.'

उद्धव ठाकरे पुढे असेही म्हणाले की, 'राज्याबरोबर, देशातील महागाईवर बोलण्यासाठी या लोकांची दातखिळी बसते. महागाईवर हे लोक एक चकार शब्द बोलत नाहीत. तसेच, दसरा मेळावा हे हिंदुत्वाचं पावित्र आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा गृहमंत्री आहेत की, भाजपचे घरगुती मंत्री आहेत हे काही ठरत नाही? राज्या-राज्यामधील सरकारे पाडण्याचा चंगचं त्यांनी बांधला आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने ताकद दाखवयाची असेल तर चीनकडून आपल्या हक्काची जमीन घेऊन दाखवा, आहे का हिम्मत?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT