Creating bad situation in country Because of Thali Bajao, Praniti Shinde criticized Modi Dainik Gomntak
महाराष्ट्र

‘ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’,प्रणिती शिंदेंची मोदींवर जहरी टीका

काँग्रेसच्या (Congress) सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेसच्या (Congress) सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे. कोरोनाच्या (COVID-19) सुरूवातीच्या काळात योग्य उपाययोजना न करता देशाला टाळ्या आणि थाळ्या (Thali Event) वाजवायला सांगितल्या. आणि यामुळेच आपल्या देशात अवदसा अली असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी नेरंद्र मोदींवर शरसंधान साधले आहे. आम्ही लहानपणी ऐकलं होत की जर थाळ्या वाजवल्या तर अवदसा येते. आणि त्याचाच प्रत्यय देशात आला.

कोरोना महामारी सारखे संकट हाताळायला सरकार कमी पडले, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदींच जबाबदार आहेत असेही प्रणिती शिंदे यमाई म्हण्टले आहे.देशावर इतके मोठे संकट असताना सुद्धा पंतप्रधान माध्यमांसमोर आले नाहीत कारण ते माध्यमांशी बोलायला घाबरतात. मतदानाच्या वेळी मात्र ते नक्की समोर येतात आणि मत मागतात, यावेळी त्यांना लाजही वाटत नाही, अशा शब्दात शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे.

त्याचबरोबर प्रणिती शिंदेनी EVM मशीनला धरूनही मोदींना टार्गेट केले आहे. पंतप्रधान मोदी यांचे भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे आणि त्यामुळेच हाताला मतदान केलं तरी ते भाजपलाच जाते . त्यामुळे आधीचे बॅलेट पेपरच बरे होते आणि आम्ही आता त्यासाठीच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावरही तत्यांनी यावेळी बोलताना भाष्य केले आहे. या धरणाचे पाणी इंदापूरला सोडण्याची चर्चा सुरू आहे पण ‘प्राण जाये, पर पाणी न जाये’ असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापुराला घेऊन जाऊ दिले जाणार नाही असा इशाराच दिला आहे. आणि आता याचमुळे कांग्रेस आणि राष्टवादीचाही वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT