Court grants bail to Kalicharan Maharaj
Court grants bail to Kalicharan Maharaj Dainik Gomantak
महाराष्ट्र

भडकाऊ भाषण करणाऱ्या कालिचरण महाराजांना जामीन मंजूर

दैनिक गोमन्तक

कालिचरण महाराज उर्फ ​​अभिजित धनंजय सरग यांना भडकाऊ भाषण प्रकरणी पुण्यातील न्यायालयाने शुक्रवारी सायंकाळी जामीन मंजूर केला. गेल्या महिन्यात पुण्यात कालीचरण यांनी प्रक्षोभक भाषण केले होते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. (Court grants bail to Kalicharan Maharaj)

या प्रकरणी पुणे (Pune) पोलिसांनी कालीचरण महाराज यांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले, तेथून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) कालीचरण (Kalicharan Maharaj) यांना छत्तीसगडमधील रायपूर येथून आणले होते. एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर गुरुवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांचे वकील अमोल डांगे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. ते म्हणाले, ज्या पोलीस अधिकाऱ्याने कालीचरण यांना अटक केली त्यांनी दंड संहितेच्या कलम 41A अन्वये कोणतीही नोटीस बजावली नाही, त्यामुळे अटक बेकायदेशीर आहे. कालीचरण यांच्यावरील गुन्हा अजामीनपात्र आणि गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT