Uber Dainik Gomantak
महाराष्ट्र

Uber ला ग्राहक न्यायालयाचा दणका; फ्लाईट चुकलेल्या महिलेला 20 हजार रूपये देण्याचे आदेश

न्यायालयाने उबर कंपनीवर सेवा बजावण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत, वीस हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

उबर या कॅब सेवा (Uber Cab Service) पुरवणाऱ्या कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. सेवा पुरवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ग्राहक न्यायालयाने कंपनीवर ठेवला आहे. बुक केलेली कॅब वेळेत न आल्याने मुंबईतील महिलेची फ्लाईट (Flight) चुकली, त्यानंतर महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. या खटल्यावर निकाल देताना न्यायालयाने उबर कंपनीला दोषी ठरवले आहे.

कविता शर्मा या पेशाने वकिल असलेल्या डोंबिवली येथील महिला मुंबई येथून चेन्नईला जाणार होत्या. 12 जून 2018 रोजी सायंकाळी 05:50 रोजी त्यांची चेन्नईसाठी फ्लाईट होती. शर्मा यांना राहत्या घरापासून सुमारे 36 किमीचा प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जावे लागणार होते. त्यासाठी त्यांनी 3:29 वाजता उबरची कॅब बुक केली. कॅब चालकाला वारंवार फोन केल्यानंतर 14 मिनिटाचा उशीर करून चालक ठिकाणार पोहचला. तसेच, कॅब चालकाने इतर कारणे देत आणखी 15 ते 20 मिनिटाचा उशीर केला.

सायंकाळी पाच वाजता पोहचणारी कॅब 5:23 वाजता विमानतळावर पोहचली. झालेल्या विलंबामुळे महिलेची फ्लाईट चुकली. तसेच, उबरने महिलेकडून, 703 रूपये घेतले मात्र, कॅब बुक केली त्यावेळेला 563 रूपये दाखवत होते. असे कविता शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, झालेल्या विलंबामुळे शर्मा यांची फ्लाईट चुकली व शर्मा यांनी दुसरे तिकिट काढून प्रवास केला. शर्मा यांनी कंपनीकडे तक्रार केल्यानंतर कपंनी 139 रूपयांचा रिफंड केला. त्यानंतर शर्मा यांनी उबरला कायदेशीर नोटीस बजावली, ज्याचे कंपनीने उत्तर दिले नाही.

कविता शर्मा यांनी ठाण्याती ग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने उबर कंपनीवर सेवा बजावण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत, वीस हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. यात दहा हजार रूपये शर्मा यांना झालेल्या मानसिक त्रास आणि उरलेले दहा हजार रूपये शर्मा यांच्या खटल्याचा खर्च देण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT