CNG  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ऑटो-कारचा प्रवास झाला महाग, CNG गॅसच्या दरात आणखी मोठी वाढ

गॅसची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते आणि त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीवर दिसून येतो

दैनिक गोमन्तक

आज महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलमध्ये (Petrol Diesel rate) वाढ झाली नाही , मात्र सीएनजी गॅसच्या (CNG price today) दरात वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी गॅसच्या दरात 2.20 रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात आला आहे. पुण्यात सीएनजी गॅसची किंमत रु.77.20 आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी ही माहिती दिली आहे. (CNG price)

एप्रिल महिन्यात नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. यापूर्वी सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅटचा दर 13 टक्क्यांवरून 3 टक्के केला होता. व्हॅटचे नवीन दर 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आले. व्हॅट कपात केल्यानंतर पुण्यात सीएनजी गॅसची किंमत 62 रुपये किलोवर आली. अवघ्या आठवडाभरात ही दरवाढ सुरू झाली असून एप्रिलमध्ये आतापर्यंत 15 रुपयांनी महाग झाली आहे.

एप्रिल महिन्यात प्रथमच CNG दरात वाढ करण्यात आली. 6 एप्रिल रोजी सीएनजी गॅसच्या किमतीत 7 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यानंतर 13 एप्रिल रोजी किलोमागे 5 रुपयांनी वाढ करण्यात आली. 18 एप्रिल रोजी 2 रुपयांनी वाढ करण्यात आली. आता भावात 2.20 रुपयांची झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत असल्याचे कारण वाढवण्याचे कारण देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी

वाढत्या किमतीबाबत अली दारूवाला म्हणाले की, देशांतर्गत गॅसचे उत्पादन मागणीच्या अनुरूप नाही. अशा स्थितीत गॅसची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते आणि त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीवर दिसून येतो. गेल्या वर्षभरात भारताची मागणी तिपटीने वाढल्याचे ते म्हणाले.

सीएनजीचा दर 80 रुपयांपर्यंत पोहोचेल

भारत कतार, मस्कत आणि इतर अरबी देशांकडून मोठ्या प्रमाणावर गॅस खरेदी करतो. गेल्या काही वर्षांत, ही किंमत प्रति सिलेंडर 20 रूपये झाली आहे. मात्र, युक्रेनच्या युद्धामुळे किमतीत वाढ झाली आहे. रशियावर निर्बंध लादल्यानंतर युरोपीय देशांनी या अरब देशांकडून प्रति सिलिंडर 40 डॉलरने गॅस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे भारतासाठीही हा दर महाग झाला आहे. युरोपीय देशांसाठीही हा सर्वात स्वस्त दर आहे. दारूवाला म्हणाले की, लवकरच त्यांच्या देशात सीएनजी गॅसची किंमत 80 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

SCROLL FOR NEXT