Coca-Cola Company Plant In Ratnagiri 
महाराष्ट्र

Coca-Cola: कोकणात आली 'कोका-कोला' कंपनी, भूमीपूजन झाले; 2,000 लोकांना मिळणार रोजगार

कोका कोलाच्या कोकणातील या नवीन प्लांटमध्ये कंपनीची 60 उत्पादने उत्पादित होणार आहेत.

Pramod Yadav

Coca-Cola Company Plant In Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज लिमिटेड कंपनीच्या प्लांटचा भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. 2,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या या प्लांटच्या माध्यमातून 2 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, हिंदुस्थान कोका कोला ब्रेव्हरेज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पाब्लो रोड्रिक्स, मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू प्रियदर्शी तसेच सर्व स्थानिक अधिकारी शिवसेनेचे सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक उपस्थित होते.

कोका कोलाच्या कोकणातील या नवीन प्लांटमध्ये कंपनीची 60 उत्पादने उत्पादित होणार आहेत. शासनाकडून या कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.

कोकणच्या जनतेवर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच प्रेम केलं आहे, परंतु काही लोकांनी केवळ कोकणी माणसाच्या जीवावर राजकारण केले, मात्र आम्ही केवळ राजकारणासाठी कोकणी माणसाचा वापर करणार नाही तर इथे उद्योगधंदे आणून त्यांना रोजगार देणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यापुढेही कोकणात अनेक उद्योग येणार असून कोकणाला विकासाकडे घेऊन जाणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सहकार्याने राज्यात उद्योग वाढत असून गुंतवणुकीसाठी आजही उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्राला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कोकणच्या विकासासाठी घोषणा करण्यात आलेल्या कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. मुंबई- गोवा ग्रीनफिल्ड रस्ता आपण तयार करत आहोत. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू असून त्यांना नक्की मदत दिली जाईल असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT