CM uddhav thackeray  
महाराष्ट्र

आधी रामाच्या नावाने आणि आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? ठाकरे यांचे भाजपला प्रत्युत्तर

'का नाही मारत दाऊदला? उडवा ना!'

दैनिक गोमन्तक

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घालत टीका करणाऱ्या भाजपवर सडकून टीका केली. तसेच आधी निवडणुकीसाठी राम मंदिराचा विषय उचलला आणि मतं मागीतली. तो विषय निकाली लागल्याने आता यापुढे दाऊदचा विषय घेणार आहात का? आधी रामाच्या नावाने आणि येथून पुढे दाऊदच्या नावाने मतं मागणार आहात का? असा सवाल उपस्थित केला. (CM uddhav thackeray slams bjp ahead of maharashtra budget session on dawood)

मुख्यमंत्री ठाकरे (chief minister Uddhav Thackeray) म्हणाले, यंदाच्या अधिवेशनात दाऊद आणि जुते हा विषय सारखा उचलला आणि चगळला गेला. पण ज्या दाऊदच्या नावावर राजकारण करता हा दाऊद आहे तरी कुठे? याची माहिती तरी आहे का? हे कोणालाच माहित नाही. यावेळी मुख्यमंत्री (CM) ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे उपमुख्यमंत्री असतानाचा किस्सा सांगितला, त्यांनी सांगितलं होतं की, दाऊदला आम्ही फरफटत आणू. पण सध्या दाऊद नाही तर आपणच त्याच्या फरफटत जात आहोत. त्याचा हा हस्तक तो हस्तक म्हणून शोध घेत आहोत.

तसेच त्यांनी टीका करणाऱ्या भाजपवर (BJP) हल्ला चढवताना, ओबामा यांनी आपण हल्ला केला तर पाकिस्तान (Pakistan) काय करेल? याची पर्वा केली नाही. तर त्यांनी आपल्या देशात हल्ला करणारा ज्या देशात होता तेथे सैन्य उतरवले आणि लादेनचा (Osama bin Laden) खात्मा केला. पण त्यांनी ओसामाच्या नावाने मतं मागितली नाहीत? किंवा निवडणुकीत तसा उल्लेख ही केला नाही. याला म्हणतात मर्दपणा. का नाही मारत दाऊदला? तुम्हाला माहित आहे ना? तर जा घुसा दाऊदच्या (dawood ibrahim) घरात आणि मारा त्याला.

त्याचबरोबर मी कडवड हिंदुत्ववादी आहे आणि राहणारच असं बोलताना, काश्मीरमध्ये (Kashmir) मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेत भाजप होती. हे विसरलात का? बुरहान वाणीला मारल्यावर त्याच्या घरी या मेहबुबा मुफ्ती गेल्या होत्या. तेंव्हा ही तुम्ही त्यांच्या सत्तेत सामिल होताच. त्यामुळे काहीही न करता फक्त आरोप करू नका. तर देशद्रोहांच्या विरोधात आम्ही आहोत त्यात दुमत नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT