Devendra Fadnavis & Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Eknath Shinde यांच्याकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट, भूविकास बँकेच्या थकबाकीदारांचे कर्ज माफ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणारा निर्णय घेतला आहे. भूविकास बँकेतून (Bhuvikas Bank) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. गुरूवारी (दि.20) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास 964 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रात वाहनांच्या ऐच्छिक 'स्क्रॅपिंग'साठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून जवळपास 964 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल तसेच भू-विकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र स्थापन करण्यात येणार आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्वाचे निर्णय

वाहनांच्या ऐच्छिक 'स्क्रॅपिंग'मध्ये स्क्रॅपिंग होत असलेल्या वाहनाचा थकित वाहन करावरील व्याज माफ, पर्यावरण कर आणि त्यावरील व्याजही माफ होणार आहे. आठ वर्षांच्या आत वाहन स्क्रॅप केल्यास वार्षिक कराच्या दहा टक्के सूट तर, 15 वर्षांच्या आत वाहन स्क्रॅप केल्यास वाहनाच्या एकरकमी कराच्या दहा टक्के सूट.

5G सेवांचा अधिक क्षमतेने वापर करण्यासाठी स्वतंत्र धोरणास मान्यता

नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्रा स्थापन करण्याचा निर्णय, विविध विभागातील 149 पदे मित्राकडे वर्ग करणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Badminton: गोव्याचा 16 वर्षीय आरुष पावसकरची जागतिक ज्युनियर मानांकनात झेप; 28 स्थानांची प्रगती, कारकिर्दीतील सर्वोत्तम 89वा क्रमांक

Goa Coconut Prices: गणेशचतुर्थीच्या आधी नारळाच्या दरवाढीला लगाम; फलोत्पादन महामंडळ ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर करणार विक्री

Goa Assembly Session: 27 विरुद्ध 7! 'गोवा नोंदणी सुधारणा विधेयक' विधानसभेत बहुमताने मंजूर; सरकारनं विरोधकांची मागणी फेटाळली

Goa Shack Policy: शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, सरकारचा फायनल निर्णय नाही

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT