CM Eknath Shinde & Devendra Fadnavis | Maharashtra Fuel Price News Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिंदे सरकारचा निर्णय; पेट्रोल 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपये प्रति लिटरने कपात

पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतर राज्यातील तेलाच्या दरामध्ये काहीसा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी जाहीर केले की महाराष्ट्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करत आहे. तसेच पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने दर कमी करण्यात आले आहेत. यानंतर आता महाराष्ट्रात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त असणार आहेत. (CM Eknath Shinde decision Rs 5 for petrol and Rs 3 for diesel)

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.

पत्रकार परिषद दरम्यान शिंदे म्हणाले की, "केंद्र सरकारने 4 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केली होती. केंद्रानेही राज्यांना त्यांच्या करामध्ये कपात करण्याचे आवाहन केले होते. पूर्वीच्या सरकारने कपात केली नाही, परंतु आमच्या सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी कमी केले आहे पण यामुळे सरकारी तिजोरीवर 6 हजार कोटींचा बोजा पडणार असला तरी त्यामुळे राज्यातील महागाई कमी होईल. (Maharashtra Fuel Price News Updates)

या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मराठी मनुष्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचं यावेळी म्हटलं आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे, त्यामुळे देशांतर्गत तेलाच्या किमतींवर त्याचा काही परिणाम होईल का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT