Eknath shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Eknath Shinde: मी पण मुख्यमंत्री होऊ शकते का..? चिमुरडीचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Eknath Shinde: शिंदेचा एका चिमुरडीसोबतचा व्हिडिओ व्हायरल

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांसह गुवाहाटीत अनेक दिवस तळ ठोकला राहिले होता. शिवसेनेकडून तिच्यावर मोठ्या प्रमाणा वर टिका होते,मात्र आता एकनाथ शिंदेचा एका चिमुरडीसोबतचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक मुलगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीबद्दल प्रश्न विचारते,ज्यावर तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात.

रविवारी एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचलेल्या मुलीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुलीने एकनाथ शिंदे यांना सांगितले की,तुम्ही गुवाहाटीला गेला होता तेव्हा तुम्ही तेथील पूरग्रस्तांना मदत केली होती. ती मुलगी म्हणाली,मी पण पाण्यात जाऊन पूरग्रस्तांना मदत केली तर मी पण मुख्यमंत्री होऊ शकते का? असा प्रश्न विचारल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुलीच्या खांद्यावर हात ठेवत होणार ते होणार अस सांगितले. इतकच नाही तर रत्नागिरीत राहणाऱ्या मुलीने सांगितले की,पहिले मला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच आवडायचे,पण आता तुम्हालाही पाहून बरे वाटले.

त्या नंतर ती मुलगी म्हणाली आगामी दिवाळीच्या सुट्टीत मला गुवाहाटीला भेटायला घेऊन जाणार का? हा प्रश्न ऐकून उपस्थित सर्वजण हसलेतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय बोलावे ते समजेना. यावर एकनाथ शिंदे यांनी फक्त हसत मान हलवली.यानंतर एकनाथ शिंदे यांनी विचारले की,तुम्हाला कामाख्या मंदिरातील देवीचे दर्शन घ्यायचे आहे का? यावर मुलीने हो असे उत्तर दिले.

यावर एकनाथ शिंदे म्हणाले की,तु खूप हुशार आहे. 21 जून रोजी एकनाथ शिंदे शिवसेने विरोधात बंड करून अनेक आमदारांसह सुरतला गेले होते. नंतर ते गुवाहाटीला रवाना झाले आणि तेथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये त्यांनी आमदारांसोबत मुक्काम केला. गुवाहाटीतील मुक्कामादरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून पूर संकटाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रुपयांची देणगीही देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT