Rain  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रासह गोव्यात ढगाळ वातावरण; पुढील 2 दिवस पावसाची शक्यता

कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: राज्यातील काही भागात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही तालुक्यांचा समावेश होता. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात अचानक बदल झाले आहेत.

परिणामी उपसागरात चक्रीवादळसदृष्य परिस्थिती तयार झाली आहे. ही परिस्थिती 19 ते 22 मार्चदरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे. अंदमानकडे जाणाऱ्या विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान अरबी समुद्रात 'प्रि मान्सून' स्थिती तयार झाल्याने कोकणातही पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर (Kolhapur), सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात (Goa) वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. असनी या चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनारपट्टीला बसणार नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. मात्र, अवकाळी पाऊस झाल्यास काजू आणि आंब्याच्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

श्वास कोंडणाऱ्या 'त्या' घटनेचा हिशोब होणार! कुंकळ्ळी अमोनिया गळतीप्रकरणी सुनावणी सुरु होणार; औद्योगिक सुरक्षेशी खेळणाऱ्यांना दणका

नुवे घरफोडी प्रकरण! कुख्यात 'पारधी गँग'चा गुंड अर्जुन गायकवाडच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ; अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडणार?

Goa Tourists Manali Trip: मनालीत गोमंतकीय पर्यटकांची मृत्यूशी झुंज! 48 जणांची सुखरुप सुटका; 'श्रीपाद भाऊं’चा मायेचा आधार

Ponda Fish Market: अस्वच्छतेचा कळस! फोंडा मासळी मार्केटमध्ये दुर्गंधी अन् किड्यांचं साम्राज्य; अनागोंदी कारभारावर व्यापाऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT