Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Breaking News: 'संविधानाने केंद्रा इतकेच राज्यांनाही अधिकार दिले'

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायंमदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायंमदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी उपस्थित होते.

म्हणाले, एका अप्रतिम न्यायमंदीराचे आज लोकार्पण होत आहे. परंतु झेंडा लावण्यासाठी मी आलो आहे. या इमारतीबद्दल मी आपण सर्वांनी ऐकलं आहे. या खंडपीठाचा इतिहासही सर्वांना माहिती आहे. ही इमारत पाहण्यासाठीही लोक आले पाहिजे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये'. मुंबईमधील कोर्टरुममध्येच लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क अधिकार आहे' अशी सिंहगर्जना केली होती. या वास्तू आपल्या चौतन्यांमध्ये स्फुरण चढवतात. न्यायमूर्ती किती काम करतात हे आपल्याला माहिती आहे, मात्र दुसरीकडे न्यायविलंब होतो हे ही आपण पाहतो. न्यायाच्या प्रक्रियेमध्ये गती देण्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्य केले पाहिजे.

तसेच, उच्च न्यायालयाच्या इमारतीचे उभारणी आम्ही लवकरच करु. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीपैकी आपली एक लोकशाही आहे. कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, प्रसारमाध्यमे ही आपली शक्ती आहेत. घटनेचे चारही स्तंभ आपल्या देशाचे मुख्य घटक आहेत. मात्र या चार स्तंभापैकी एक जरी स्तंभ कोसळला तर लोकशाहीचे छप्पर कोसळून पडेल, आणि हे झाले तर यासारखे आभागी आपणच. त्याचबरोबर आपण पोलिस स्टेशनची नव्याने निर्मिती करत आहोत. पोलिस निवृत्त होईपर्यंत तो पोलिस नाईक झाला पाहिजे यासंबंधी मी घोषणा करतो आहे. शिवाय, वाईल्ड लाईफ लॅबची निर्मीतीही आम्ही नागपूरमध्ये करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शिवाय, महिलांवरील अत्याचार आपल्या देशात मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. ज्या महिलांना घरच नाही त्यांच्यासाठी आम्ही निवाऱ्याची प्राथमिक स्तरावर सोय मुंबईमध्ये केली आहे. गुन्हेगारीमुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये आपण कुठे आहोत याचाही विचार यावेळी आपण केला पाहिजे, असही मुख्यंमत्री यावेळी म्हणाले. आपणही आपल्या स्वातंत्र्यांचे आमृतमंथन करायला हवे. आपल्या देशाच्या घटनेमध्ये नमेकं काय लिहलं आहे? राज्याचा आणि केंद्राचे संबंध कशाप्रकारे आहेत, याचा विचार केला पाहिजे. केंद्राएवढेच राज्यांना काही अधिकार आहेत, मात्र यातील काही अधिकार सोडले तर. कोणला किती अधिकार आहेत हे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT