Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनी सुनावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री ठाकरेंनी उत्तर देताना राज्याच्या थकबाकीची करुन दिली आठवण

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरवाढीवरुन महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांनी व्हॅट कमी करायला पाहिजे,” असा सल्ला दिला. (Chief Minister Uddhav Thackeray replied to Prime Minister Modi )

या बैठकिदरम्यान उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याची केंद्राकडे असलेल्या थकबाकीची आठवण करुन देत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य असून राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे,” अशी आठवण ही करुन दिली आहे.

या थकबाकीबाबत स्पष्टीकरण देताना “महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

तसेच तोक्तसारख्या चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेल्याचं ही ते सांगाण्यास विसरले नाहीत. आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT