'स्वार्थ', निवडणूक लढवण्यासाठी पाच राज्यांमध्ये 276 उमेदवारांनी बदलले पक्ष : ADR रिपोर्ट

देशात 2022 मध्ये पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पक्ष बदललेल्या 276 उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवारांनी बहुजन समाज पक्ष (BSP) सोडला.
India
IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

देशात 2022 मध्ये पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पक्ष बदललेल्या 276 उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवारांनी बहुजन समाज पक्ष (BSP) सोडला. तर दुसरीकडे, 13 टक्के उमेदवारांनी काँग्रेसला (Congress) रामराम केला असल्याचे निवडणूक वॉचडॉग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एडीआरने मंगळवारी सांगितले आहे. (276 candidates change parties to contest Assembly elections in five states ADR report)

'नॅशनल इलेक्शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) ने 276 उमेदवार आणि 85 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले ज्यांनी 2017 ते 2022 पर्यंत पक्षांतर केले. विशेष म्हणजे त्यांनी या वर्षीच्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका लढल्या.

India
'कोरोना विरोधात लस हेच कवच'; पंतप्रधान मोदींचे राज्यांना मोठे आवाहन

अहवालानुसार, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड, पंजाब (Punjab), मणिपूर आणि गोवा (Goa) मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 27 टक्के (75 Candidates) बसपा सोडून दुसऱ्या पक्षात सामील झाले, तर (37 Candidates) 13 टक्के लोकांनी काँग्रेस पक्ष त्यागला. 2022 च्या निवडणुकीत 276 पैकी 54 (20 Percent) उमेदवार समाजवादी पार्टी (SP) मध्ये सामील झाले. यानंतर 35 उमेदवार (13 Percent) भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये आणि 31 उमेदवार (11 Percent) बसपामध्ये सामील झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 27 आमदारांनी (32 Percent) भाजप सोडला, तर 24 आमदारांनी (28 Percent) काँग्रेस सोडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com