Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

आमचं हिंदुत्व गदाधारी, तर भाजपचं...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दैनिक गोमन्तक

Uddhav Thackeray Aurangabad Sabha: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये विराट सभा झाली होती. यामध्ये त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्यावरुन राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आव्हान दिलं होतं. यातच आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकेर यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपसह इतर राजकीय पक्षांचा चांगलाचं समाचार घेतला. त्याचबरोबर सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांची यादीही त्यांनी वाचली. राज्यातील जनतेला सुशासन हवे आहे, असे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी आमचे सरकार सदैव काम करत राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ''मराठवाड्यामध्ये शिवसेनेने आपल्या पक्षाचं रोपटं रोवलं ती आजची तारीख आहे. शस्त्रक्रियेनंतर तब्बल सहा महिन्यांनी मी मुंबईच्या बाहेर पडलो आहे. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. परंतु आज प्रामुख्याने संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाविषयी मी बोलणार आहे. संभाजीनगरचा पाणी प्रश्न खूप बिकट आहे. त्यामुळे प्रशासनाला आदेश देण्यात आले की, तात्काळ हा पाणी प्रश्न मिटला पाहिजे. दुसरीकडे, मात्र विरोधकांनी जन आक्रोश मोर्चा काढला होता. परंतु त्यांचा जन आक्रोश मोर्चा केवळ मतांसाठी होता. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यामुळे त्यांना आमच्या हिंदुत्वाविषयी बोलण्याची काही एक गरज नाही.''

दरम्यान मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ''निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईत संभाजीनगर मेट्रो आणि इतर विकास कामांची घोषणा करणार नाही. व्यवस्थित नियोजन करुनच आम्ही आराखडा तयार करणार आहे. विकासाच्या नावावर शहर उद्ध्वस्त करणार नाही. दुसरीकडे, मी आत्ता शहराचं नाव बदलू शकतो, मात्र नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला तर छत्रपती संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. भाजपने आपल्या तिनपाट प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. हिंदुत्व हे केवळ भगव्या टोपीत असेल तर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) काळी टोपी का घालते? भाजप जर ऐकत नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे.''

मुख्यमंत्री म्हणाले, ''जो देशासाठी आपला प्राण द्यायला तयार असतो तो मग कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आम्हाला एखाद्या धर्माचा द्वेष करा असं कधीच सांगितलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा सन्मान केला होता. दुसरीकडे, देशासाठी औरंगजेब नावाच्या आपल्या जम्मू काश्मीरमधील जवानाने बलिदानं दिलं.''

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेवटी म्हणाले, ''भाजप नेते Gopinath Munde संभाजीनगरविषयी बोलण्यासाठी शिवसेनाप्रमुखांकडे आले होते. तेव्हा त्यांनी यावेळी आम्हाला महापौर द्या, अशी मागणी केली होती. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी एका क्षणात होकार दिला होता. ते कागदावर आकडेमोड करत बसले नव्हते. दुसरीकडे, राज्यात ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा धर्माची गोळी द्यायची ही भाजपची रणनिती आहे. अच्छे दिन आले का? कधी येणार? निवडणुकांची घोषणा होते तेव्हा नको त्या खपल्या भाजपकडून काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतांची भिक मागून सत्तेवर यायचं, मग त्यामध्ये मतदारराजा मेला तरी चालेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT