राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत आढवा घेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठिशी असून, आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत. असे अश्वासन दिले आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

मराठवाड्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

महसूल विभागाने (Department of Revenue) झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सततच्या पावसाने अनेकांचे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतातील पीकांचे नुकसान झाले असून, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे वाहून गेला आहे. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबत आढवा घेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठिशी असून, आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत. असे अश्वासन दिले आहे.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून, अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेकांचे स्थलांतर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी या परिस्थितीची चर्चा केली असून, नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करावे सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा असे सांगितले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याचे पालकमंत्री, मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे. मागील 24 तासांत राज्यात 26 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात मराठवाड्यातील अनेक जिल्हे प्रभावित झाले आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सततच्या पावसाने अनेकांचे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतातील पीकांचे नुकसान झाले असून, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

या भागातील अनेक विद्यार्थी सीईटीच्या प्रवेशासाठी केंद्रावर पोहोचू शकले नसले तरी त्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना नवीन तारखांबाबत माहिती द्या असे निर्देशही देण्यात आले आहेत. एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलीस यंत्रणेने लातूर, उस्मानाबाद, औरंगाबात, यवतमाळ या भागातील 100 पेक्षा जास्त जवानांचे प्राण वाचविण्यात आले आहे. उस्मानाबादेतून 16, लातूरमधून 3 तर यवतमाळ आणि औरंगाबादेतून अनुक्रमे 2 जणांचे प्राण हेलिकॉप्टरने तसेच याच भागांतून बोटीने एकूण 91 जणांचे प्राण वाचविले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

SCROLL FOR NEXT