Chhattisgarh 4 jawans of CRPF 50Bn killed  Dainik Gomantak
महाराष्ट्र

छत्तीसगडमधील सुकमा येथे सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात 4 CRPF जवान ठार

सुकमा जिल्ह्यातील मारिगुडा पोलीस स्टेशन हद्दीतील लिगम पल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्प येथे ही घटना घडली.

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या एका CRPF जवानाने सुकमा येथे आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला, ज्यात चार जवान (4 jawans) शहीद झाले तर तीन जखमी झाले. सुकमा जिल्ह्यातील मारिगुडा पोलीस स्टेशन हद्दीतील लिगम पल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्प येथे रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, मराईगुडा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानांची हाणामारी झाली, त्यानंतर संतप्त जवानाने गोळीबार सुरू केला, ज्यामुळे 4 जवानांचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच 3 जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्यापैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी जवानांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना सीआरपीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, “जवान रितेश रंजनने मरीगुडा पोलीस स्टेशन अंतर्गत लिंगापल्ली येथे तैनात असलेल्या त्याच्याच साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत सात जवान जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ भद्राचलम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन जवानांना मृत घोषित केले. यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाला. त्याचवेळी तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT