चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील  Dainik Gomantak
महाराष्ट्र

पैसे घ्याल तर ED लावू; चंद्रकांत पाटील यांची मतदारांनाच धमकी

दैनिक गोमन्तक

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक बड्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना आणि अनेक नेत्यांना ईडीमुळे जेलमध्ये जावे लागले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेलाच ईडी चौकशी लाऊ अशी धमक दिल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटप होण्याची शक्यता वर्तवत ज्यांनी पैसे घेतले त्याच्याविरोधात ईडी चौकशी लागू शकते असा इशारा दिला आहे. (Chandrakant Patil said Congress is using digital payment mode to bribe voters)

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवर सध्या महाराष्ट्रातील तमामा जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. येथे काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले असून आरोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी झाडल्या जात असून या प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आज पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापूरच्या मतदारांना पैसे दिले जाणार असून त्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत आपण ईडीला पत्र पाठवले असून जो पैसे वाटणार आणि जो घेणार त्याची चौकशी करावी अशी विनंती केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मतदारामागे ईडीची चौकशी लागेल असा इशाराच पाटील यांनी दिला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून एका शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना घरोघरी फिरुन एक फॉर्म भरुन घेताना पाहत आहे. त्यात नावं, वय, फोन नंबर, बँक अकाऊंट नंबर याची माहिती घेतली जात आहे. अशी माहिती कोण कशासाठी गोळा करत आहे? त्यावर आयोगाने (Election Commission) चौकशी करुन कारवाई करायला हवी. पण आता माझ्याकडे याची पक्की माहिती आली असून ही माहिती पेटीएमच्या (Paytm) माध्यमातून मतदारांना (voters) पैसे पाठविण्यासाठी घेतली जात आहे. त्यामुळे मी नागरीकांना सावध करत आहे. आम्ही ईडीला पत्र पाठवले असून जो पैसे वाटणार आणि जो घेणार त्याची चौकशी करावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावर १००० रुपये किंवा प्रतिव्यक्ती १००० रुपये आले तर त्यांची उत्तर तुम्हाला ईडीला द्यावी लागतील. त्यामुळे १ हजार रुपयांच्या मोहापायी नागरिकांनीही ईडी (ED) चौकशीचा शुक्लकाष्ठ मागे लावून घेवू नये असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT