Konkan Railway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! शिमग्याच्या तोंडावर पुन्हा धावणार सावंतवाडी पॅसेंजर आणि दादर-रत्नागिरी ट्रेन

Dadar-Ratnagiri, Sawantwadi Passenger: मध्य रेल्वेनं बंद केलेल्या दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

Sameer Amunekar

Dadar-Ratnagiri And Sawantwadi Passenger

सावंतवाडी: मध्य रेल्वेनं बंद केलेल्या दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. शिमगा सणाच्या तोंडावर या ट्रेन पुन्हा सुरू करण्याच्या रेल्वेच्या निर्णयामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.

१ मार्चपर्यंत गाड्या सुरू न झाल्यास दादर स्टेशनवर 'रेल रोको' आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला होता.

विनायक राऊत यांच्या इशार्‍यानंतर, रेल्वे प्रशासनानं अखेर दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिमग्याच्या तोंडावर खुशखबर

शिमगा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि या पार्श्वभूमीवर दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयामुळं कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळला आहे.

शिमगा हा कोकणातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक असून, या काळात गावाकडील लोक मोठ्या संख्येनं मुंबई आणि अन्य ठिकाणांहून कोकणात गावी येत असतात.

कोरोना काळात या पॅसेंजर गाड्या बंद झाल्यानंतर त्या अद्याप सुरू झाल्या नव्हत्या. गेल्या काही वर्षांपासून या गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतूक, एसटी बस किंवा अन्य महागड्या पर्यायांवर अवलंबून राहावं लागत होतं.

दरम्यान, रेल्वे प्रशासनानं या गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता सुटकेचा निःश्वास टाकता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: सावर्डे पंचायतीची प्रलंबीत इमारत,कर्मचारी कमतरता दूर करणार

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT