Nitin Gadkari on Mumbai-Goa Highway work  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील सिंगल लेनचे काम गणपतीपुर्वी पूर्ण करा; नितीन गडकरींचे आदेश

महामार्गाचे काम वेगाने करण्याचीही सूचना; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत बैठक

Akshay Nirmale

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण करा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

आज, मंगळवारी गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेतली.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील सिंगल लेनचे काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर चव्हाण बोलत होते.

मंत्री चव्हाण म्हणाले की, सुरवातीचा पनवेल-इंदापूर हा ४२ किलोमीटरचा रस्ता सिंगल लेन काँक्रिट रस्ता पावसाळ्यापुर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधीपर्यंत पुर्ण होणार याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यापुर्वीच डेडलाईन दिली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे गडकरी यांनी यापुर्वीच सांगितले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करा : गडकरी

गडकरी म्हणाले की, 15 वर्षापूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहिर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावी यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करावे.

मोठ्या आणि विकसित जिल्ह्यांमध्ये 4 आणि लहान अविकसित जिल्ह्यात दोन अशी किमान 150 ते 200 युनिट सुरू करावीत. यामुळे किमान 10 ते 15 हजार जणांना रोजगार मिळू शकेल. महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Goa News: गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य कार्यालयात लक्ष्मी पूजन

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT