Jitendra Awhad Dainik Gomantak
महाराष्ट्र

Thane: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड राजीनामा द्यायच्या तयारीत

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे.

"पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या ..उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत," असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे.

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आमदार आव्हाड यांच्या समर्थकांनी जाळपोळ करण्यास सुरवात केली आहे. कळवा-मुंब्रा रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना टायर जाळले आहे आहेत.

कशावरून दाखल केला गुन्हा?

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला (Thane) जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला. त्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT