Sri M
Sri M Dainik Gomantak
महाराष्ट्र

नद्यांचे पुनरुज्जीवन हवे : राजेंद्रसिंह

दैनिक गोमन्तक डिजिटल

‘‘देशातील सर्व नद्या हृदयरोगाने आजारी असून त्यांच्यावर त्याप्रमाणेच उपचारांची गरज आहे. पण असे असतानाही सध्या नद्यांवर ‘ब्युटी पार्लर’ किंवा दंतवैद्यकीय पद्धतीचे केवळ सौंदर्य वाढविणारे उपचार केले जात आहेत.

खरे तर नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे,’’ असे परखड मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

भारत ‘जी-20’ परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवित असताना ‘द सत्संग फाउंडेशन’तर्फे आणि ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्यातून ‘सिव्हल 20’ गटातील सदस्यांसाठी ‘नद्यांचे पुनरुज्जीवन आणि पाणी’ या विषयावर दोन दिवसीय जल परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. सिंह बोलत होते.

या वेळी फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री एम, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, माता अमृतानंदमयी मठाचे उपाध्यक्ष स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी, ‘सी 20’चे मुख्य समन्वयक विजय नांबियार, अभिनेता चिन्मय उदगीरकर या मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक करून परिषदेचे उद्‌घाटन झाले.

देशातील 12 प्रमुख नद्यांमधील पाणी कलशात एकत्रित केले होते.

पाण्याशिवाय जीवनाचा विचार आपण करू शकत नाही. त्यामुळे पाणी नाही; तर जीवन नाही. झाडे नाही, तर पाणीही नाही, हे समजून घेतले पाहिजे. म्हणून जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे.

- श्री एम, आध्यात्मिक गुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT