वेळसांवात पुन्हा तणाव; रेल्वेचे काम रोखले

निदर्शकांना जबरदस्तीने गाडीत घालून नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला
Velsao
VelsaoDainik Gomantak

रेल्वे विकास निगम लिमिटेडने आज वेळसांव येथे रेल्वे दुपदरीकरणासाठी अरबी समुद्राला जोडलेल्या पारंपरिक नाल्यात मातीचा भराव घालून वाटेत अडथळा निर्माण केला. यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करून गावकऱ्यांनी रेल्वेचे काम अडवले.

यावेळी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांनी ‘गोंयचो एकवोट’चे उपाध्यक्ष अशोक सौझा जबरदस्तीने गाडीत घालून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांच्या विरोधामुळे पोलिस अयशस्वी ठरले. रेल्वे खात्याने आज वेळसांव प्रभाग 6 मध्ये पुन्हा काम सुरू केले असता लोकांनी विरोध दर्शविला.

आवश्यक पर्यावरण प्रभाव मूल्यांकन किंवा सामाजिक प्रभाव मूल्यांकन न करताच बांधकाम केल्यामुळे अकल्पित संकटे येतील. रेल्वे रुळांच्या बाजूला ४०० हून अधिक कुटुंबे आहेत. यापैकी बहुतेकांचा उदरनिर्वाह भातशेतीतून चालतो.

- ऑर्विल दोरादो रॉड्रिग्स.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com