Court Dainik Gomantak
महाराष्ट्र

असाध्य आजार लग्नाआधी लपवून ठेवण्यावर HC ची कठोर टिप्पणी; घटस्फोटाला दिली मंजुरी

Bombay High Court: घटस्फोटप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Manish Jadhav

Bombay High Court: घटस्फोटप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आजार लपवून लग्न केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय ग्राह्य धरला आहे. पत्नी आणि तिच्या पालकांनी लग्नाआधी तिचा असाध्य आजार लपवल्याने न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी लग्नाआधी कोणताही असाध्य आजाराने ग्रस्त असेल आणि त्याची माहिती असेल, तर त्यांनी त्याबाबत दुसऱ्या पक्षाला कळवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि महेंद्र चांदवानी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

दरम्यान, हे प्रकरण महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 मे 2017 रोजी येथील तरुणीसोबत एका तरुणाचे लग्न झाले होते. ही मुलगी Ptosis या आजाराने ग्रस्त होती. Ptosis हा डोळ्यांचा असाध्य आजार आहे. ही माहिती मुलीच्या बाजूने लग्नाच्या वेळी देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. लग्नानंतर काही काळानंतर हा प्रकार तरुणाला समजल्यानंतर तो पत्नीपासून दूर राहू लागला. यानंतर पत्नीने पतीसोबत राहण्यास सांगितले आणि कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली.

तर दुसरीकडे पतीनेही न्यायालयात धाव घेत क्रूरतेचे कारण देत घटस्फोटाची मागणी केली. त्याने न्यायालयात सांगितले की, त्याच्या पत्नीच्या डाव्या डोळ्याला असाध्य आजार आहे, त्यामुळे झोपेतही तिचा डोळा उघडा राहतो. जिल्हा न्यायालयाने तरुणाच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयानेही घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला. निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, अशा परिस्थितीत दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगू शकणार नाहीत किंवा सेक्सचा आनंद घेऊ शकणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT