<div class="paragraphs"><p>BMC issued new guidelines for private hospitals</p></div>

BMC issued new guidelines for private hospitals

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

BMC ने खाजगी रुग्णालयांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे केली जारी

दैनिक गोमन्तक

मुंबईत ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता, बीएमसीने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बीएमसीने सर्व खाजगी रुग्णालयांना दुसऱ्या लाटेत त्यांच्याकडे असलेल्या मॅक्सिमम बेडची क्षमता पुन्हा सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच बरोबर लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोमोर्बिड असल्यास त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करावे आणि जर ते आधीच दाखल असतील आणि खाटांची कमतरता असेल तर त्यांची प्रकृती पाहून त्यांना 3 दिवसांत डिस्चार्ज द्यावा.

बीएमसीने (BMC) म्हटले आहे की रुग्णालयाने 80 टक्के कोविड बेड आणि 100 आयसीयू बेडसह वॉर्ड वॉर रूम उघडाव्यात. या वॉर्ड रूम आरक्षित असतील. आणि बीएमसीच्या परवानगीशिवाय इथे प्रवेश मिळणार नाही. सर्व खासगी रुग्णालये रुग्णांकडून सरकारने ठरवून दिलेले दरच आकारतील. आता सर्व खाजगी रुग्णालयांना कोविड (Covid-19) रुग्णाला दाखल करण्यापूर्वी बीएमसीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

बीएमसीने इमारत सील करण्याच्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केली

बीएमसीने इमारत सील करण्याच्या प्रोटोकॉलमध्ये बदल केला आहे. बीएमसीच्या नवीन परिपत्रकानुसार, एखाद्या इमारतीच्या विंग, कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीच्या 20 टक्के फ्लॅटमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल. बीएमसी आयुक्त आयएस चहल यांनी हे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार रुग्ण आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. कोरोना रुग्णाला 10 दिवस वेगळे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इमारत सील करण्याची प्रक्रिया प्रभाग स्तरावर केली जाणार आहे

त्याचप्रमाणे, उच्च जोखीम असलेल्या लोकांना 7 दिवस सक्तीने क्वारंटाईन करावे लागेल. पाचव्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. सोसायटी मॅनेजिंग कमिटी क्वारंटाइन कुटुंबासाठी रेशन, औषध आणि इतर आवश्यक साहित्य पुरवेल. इमारत सील करण्याची प्रक्रिया प्रभाग स्तरावर केली जाणार आहे. कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर यांनी जारी केलेले प्रोटोकॉल आणि नियंत्रणाचे नियम लोकांना काटेकोरपणे पाळावे लागतील. कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर यांनी जारी केलेले प्रोटोकॉल आणि नियंत्रणाचे नियम लोकांना काटेकोरपणे पाळावे लागतील. मुंबईत झोपडपट्ट्यांपेक्षा जास्त इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे बीएमसीने इमारत सील करण्याच्या नियमात बदल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Tim Cook: ‘’ॲपलच्या भारतातील कामगिरीवर खूप खूश, प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यासाठी...’’

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT