Sindhudurg murder investigation Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg mystery case: रक्ताने माखलेली कार, कुजलेला मृतदेह; सिंधुदुर्गातील 'त्या' दोन गूढ घटनांमध्ये कनेक्शन काय?

Sindhudurg mystery case: तिलारी येथील कार आणि कणकवली येथील मृतदेहचा काही संबंध आहे का? याचाही तपास केला जात आहे.

Pramod Yadav

सिंधुदुर्ग: कणकवलीत धारधार शस्त्राने खून करुन कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला आहे. तर, दोडामार्गमध्ये तिलारी मुख्य वसाहतीजवळील पुलाखाली रक्ताने माखलेली संशयित कार आढळून आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये संबंध असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी यादिशेने तपास सुरु केला आहे.

खारेपाटणनजीक साळिस्ते येथे गुरुवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. श्रीनिवास रेड्डी (५३, बंगळुरु) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याबाबत खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले आहे. या व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दोन ते तीन दिवसांपूर्वी खून करुन व्यक्तीचा मृतदेह येथे फेकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याच दिवशी तिलारी येथे रक्ताने माखलेली आणि नोंदणी क्रमांक नसलेली कार आढळून आली आहे. तिलारी मुख्य वसाहतीजवळील पुलाखाली ही कार आढळून आली. तिलारी येथील कार आणि कणकवली येथील मृतदेहचा काही संबंध आहे का? याचाही तपास केला जात आहे.

कारची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी रक्ताचे नमूने आणि ठसे संकलित केले आहेत. कार सुस्थितीत असल्याने घातपाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, कणकवलीतील खूनाचा आणि कारचा संबंध असण्याची दाट शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कार आंध्र प्रदेशातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. 

दोडामार्ग आणि कणकवलीत आढळून आलेल्या गूढ कार आणि मृतदेहाचे कोडे उलघडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी यादिशेने तपास देखील सुरु केला आहे. दोन्ही घटनांचा काय संबंध असू शकतो याचा देखील कसून तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT