Chandrkant Patil Danik Gomantak
महाराष्ट्र

हसन मुश्रीफांना भाजपची ऑफर...

चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती हसन मुश्रीफ यांचा मोठा खुलासा. यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

मुंबईः किरीट सोमय्या (kirit somaiya) हे हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर घोटाळ्यांचे आरोपावर आरोप करत आहेत. सोमय्यांच्या सुरु असलेल्या आरोपांवर मुश्रीफांनी माध्यमांशी संवाद साधत सोमय्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनाही आता या प्रकरणात घेतले असून चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर प्रधान केली होती. असा मोठा दावा आता त्यांनी केला आहे. मुश्रीफांच्या या दाव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्यावर केलेल्या आरोपाना धुडकावत थेट चंद्रकांत पाटलांवरच निशाणा साधला. सोमय्यांचे जे आरोप करीत आहेत ते खोटे व बिनबुडाचे आहेत. या मागे चंद्रकांत पाटील हे यामागचे सूत्रधार आहेत. स्वतःच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कोणामुळे आणि का झाले? असा सवालही केला त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची थेट ऑफरच दिली. त्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितले, पवार एके पवार च . तसेच माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकण्यात आली. असेही मुश्रीफ यांनी सांगितले. त्यानंतर फडणवीसांनाहि टोला लावला.

मुश्रीफांचे घोटाळे उघडकीस आण्यासाठी फडणवीस- चंद्रकांत पाटलांनी दिल्या सूचना:

किरीट सोमय्यांवर केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्री कार्यलयाला माहिती नसल्याचे समोर आले आहे. यावरही फडणवीसांनी मोठे व्यक्तव्य केले. याबाबत मुख्यमंत्र्यांना(CM) माहिती नाही आणि गृहमंत्रालयाकडून ऑर्डर दिली गेली असे असू शकते? कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कारवाईवर दखल घेऊन याबाबतची कारवाई थांबवली पाहिजे होती, ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरुच आहेत. असे फडणवीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT