BJP's Jan Ashirwad Yatra is an invitation to the third wave of corona infection, says Sanjay Raut  Dainik Gomantak
महाराष्ट्र

भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण: संजय राऊत

केंद्रीय मंत्री विविध राज्यांमध्ये ही यात्रा करता आहेत. यावेळी संजय राऊत भाजप खासदारांना धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाने (BJP) आयोजित केलेल्या ‘जन आशीर्वाद यात्रा’ (Jan Ashirwad Yatra) या कार्यक्रमावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेली ‘जन आशीर्वाद यात्रा' म्हणजे कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याची गंभीर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री विविध राज्यांमध्ये ही यात्रा करता आहेत. यावेळी संजय राऊत भाजप खासदारांना धीर धरण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांनी या आठवड्याच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागांमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी दौरा सुरु केला आहे. भाजपच्या विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा भारतीय जनता पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले

एका मीडिया संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉप -5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळण्याशी संबंधित प्रश्नावर राऊत म्हणाले, "भाजप या सर्वेक्षणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे यामध्ये नाव नाही. एकाही मुख्यमंत्र्याचे नाव नाही. तसेच संजय राऊत असेही म्हणाले की, जर सर्वेक्षणाचे निकाल त्यांच्या बाजूने असते तर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून सण साजरा केला असता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT