कोल्हापूर : महाराष्ट्रातील बहूतांशी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा गेले काही दिवस सुरु होती. यापरिसंवाद यात्रेची सांगता कोल्हापुरातील सभेने होत असुन २३ एप्रिल रोजी सायंकाळी कोल्हापुरात या सभेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना राष्ट्रीय नेत्तृत्व आणि भाजप यांच्यावर सडकून टीका करत मतांचा जोगवा मागण्यासाठी भाजपने देशातील समाजात एकता साधण्याऐवजी द्वेश पसरवल्याची टीका केली.(BJP spread hatred in the nation to seek votes: Sharad Pawar)
यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, देशात जाणीवपुर्वक सिनेमा काढत जम्मू आणि काश्मिरमधील स्थिती सोयीस्करपणे दाखवत समाजातील तेढ वाढेल याची दक्षता घ्यायाची व यातूनच मतांचा जोगवा मागायचा असे प्रयत्न भाजपने केले. मात्र काश्मीरमधील वस्तुस्थिती जाणीव लपवली गेल्याचं ही ते यावेळी म्हणाले. मात्र ही घटना घडली यावेळी काश्मिरमध्ये भाजपने पाठींबा दर्शवलेले राज्य होते. हे मात्र यामध्ये कोठे ही याची माहिती दिली गेली नाही. यामूळे जाणीवपूर्वक प्रचार केला पण कोल्हापूरच्या जनतेने मात्र उत्तरच्या पोटनिवडणूकच्या निकालातून भाजपला योग्य उत्तर दिले आहे. यामूळे योग्य संदेश ही संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गेल्याचं ही ते यावेळी म्हणाले.
पवार म्हणाले कि, आपण अनेक पंतप्रधानांनचा काळ पाहीला आहे. त्या - त्या कालावधीमध्ये देशाचे पंतप्रधान जगभरातून आलेल्या पाहूण्यांना संपुर्ण देशाचं दर्शन कसं होईल याकडे जाणीवपुर्वक लक्ष देत असतं मात्र अलीकडच्या काळात जगभरातून देशात येणारे नेत्यांना फक्त आणि फक्त गुजरातचेच दौरे करवले जातात. ही स्थिती का आली तर केंद्राने संपुर्ण देशाला समदृष्टीने पाहणे गरजेचे असताना केंद्र मात्र सोयिची भुमिका घेत असल्याचं ही ते यावेळी म्हणाले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ही जाणिवपूर्वक ईडी सारख्या यंत्रणांचा अवलंब करत अटक केली. याचा ही खरपुस समाचार घेतला व आर्यन खान निर्दोष असताना अटक करत तुरुंगात टाकलं आणि चौकशीअंती न्यायालयाने आर्यन खानकडे कोणते ही अमली पदार्थ नसल्याचं स्पष्ट केलं. यामूळे या यंत्रणा कशा वापरल्या जात आहेत. यावरुन स्पष्ट होत असल्याचं ही पवार यावेळी म्हणाले. या सभेदरम्यान वेळे अभावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी केवळ हजेरी लावली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी आपली मतं व्यक्त करत उपस्थित समुदायास संबोधित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.