FIR Against Mamata Banerjee For Insulting National Anthem Dainik Gomantak
महाराष्ट्र

ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अपमान, भाजप नेत्याने केला एफआयआर दाखल

ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अपमान केलामुळे भाजप नेत्यांकडून मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी मुंबईच्या शिवडी न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांना समन्स बजावला आहे. त्यांना 2 मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकतेच ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या कार्यक्रमात अर्धे राष्ट्रगीत गायले आणि मध्येच त्या निघून गेल्या. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मुंबईतील भाजप नेत्याने राष्ट्रगीताचा अपमान (FIR Against Mamata Banerjee For Insulting National Anthem) केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात (Magistrate Court) तक्रार दाखल करत एफआयआर नोंदवली आहे.

1 डिसेंबर रोजी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होताना ममता बॅनर्जी यांनी बसलेल्या स्थितीत राष्ट्रगीताचे पहिले दोन श्लोक गायले आणि, त्यानंतर उभे राहून आणखी दोन श्लोकांचे पठण केले, आणि नंतर अचानक थांबल्या त्यामुळे त्यांच्यावरती तक्रारीत दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने जारी केलेल्या समन्समध्ये असे म्हणण्यात आले आहे की, ममता बॅनर्जी त्यांच्या ऑफिसियल ड्युटीवर नसल्याने, ते त्यांच्या ऑफिसियल ड्यूटी मध्ये येत नाही.

न्यायालयाने म्हटले की, तक्रारदाराचे म्हणणे आहे की, व्हिडिओ क्लिप आणि यूट्यूबवरील व्हिडिओवरून हे प्रथमदर्शनी स्पष्ट होते की ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीत गायले आणि अचानक त्या थांबल्या आणि नंतर स्टेजवरून निघून गेल्या. हे सिद्ध होते की राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या कलम 3 नुसार दंडनीय गुन्हा दाखल केला आहे. बॅनर्जींनी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत गुन्हा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसात तक्रार करूनही एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

FIR CM Mamata Banerjee

खरे तर ममता बॅनर्जी नुकत्याच तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचे वेळापत्रक खूप व्यस्त होते. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह नागरी समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींची यावेळी भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी मुंबईतच पत्रकार परिषदही घेतली होती. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी बसून राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. दोन ओळी गाऊन झाल्यावर त्या उठल्या आणि आणखी दोन ओळी गायल्या. त्यानंतर ते अपूर्ण सोडून त्यांनी पत्रकार परिषद घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या या वागण्यावरती अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय म्हणाले की, आपले राष्ट्रगीत हे आपल्या राष्ट्रीय अस्मितेची सर्वात शक्तिशाली अभिव्यक्ती आहे. किमान सार्वजनिक पद धारण केलेले लोक ते कमी करू शकत नाहीत. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी गायलेल्या आमच्या राष्ट्रगीताचे हे विकृत रुप आहे. हा राष्ट्रगीताचा अपमान असल्याचे सांगत अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जींना राष्ट्रगीताची प्रतिष्ठा माहीत नाही का? असा सवाल केला आहे. पश्चिम बंगाल भाजप युनिटने ट्विट केले की, “ममता बॅनर्जी आधी बसल्या, नंतर उठल्या आणि भारताचे अर्धे राष्ट्रगीत गाणे थांबवले. आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी बंगालची संस्कृती, राष्ट्रगीत, देश आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT