Kapil Mishra Dainik Gomantak
महाराष्ट्र

कन्हैया लाल यांच्यानंतर उमेश कोल्हेंच्या कुटुंबाला भाजप नेत्याने दिली 30 लाखांची मदत

कपिल मिश्रा यांनी यापूर्वी उदयपूरमध्ये हत्या झालेल्या कन्हैयालाल यांच्या नातेवाईकांना एक कोटीचा धनादेश सुपुर्द केला होता.

दैनिक गोमन्तक

Umesh Kolhe's Family: दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी गुरुवारी दिवंगत केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना 30 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कपिल मिश्रा यांनी यापूर्वी उदयपूरमध्ये हत्या झालेल्या कन्हैयालाल यांच्या नातेवाईकांनाही एक कोटीचा धनादेश सुपुर्द केला होता.

दरम्यान, "गेल्या एका वर्षात घडलेल्या घटनांचा" हवाला देत त्यांनी आरोप केला की, अमरावती ही कट्टरतावादी धार्मिक गटांसाठी दहशतवादाची प्रयोगशाळा बनली आहे. ते पुढे म्हणाले, “गेल्या नोव्हेंबरमध्ये रझा अकादमी आणि इतर अल्पसंख्याक संघटनांनी मोर्चा काढला, ज्यामुळे अमरावतीच्या बाजारपेठेत हिंसाचार झाला. त्रिपुरातील एका मशिदीच्या तोडफोडीवरुन अमरावतीत हिसांचार उसळला. परंतु यामध्ये आता निष्पाप लोक त्याची किंमत मोजत आहेत.”

दुसरीकडे, कपिल मिश्रा (Kapil Mishra) यांनी केमिस्ट कोल्हे यांच्या पत्नी, मुलगा आणि भावाची भेट घेऊन त्यांना 30 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत याने सांगितले की, 'कपिल मिश्रा यांनी न्याय मिळवून देण्यासाठी चांगला वकील नेमण्याचे आश्वासन दिले आहे.' 21 जून रोजी रात्री दोन मोटारसायकलस्वारांनी कोल्हे यांची गळा चिरुन हत्या केली.

तसेच, भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरुन त्यांची हत्या करण्यात आली. नुपूर यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. 28 जून रोजी उदयपूरमधील (Udaipur) टेलर कन्हैया लाल यांची हत्या करण्याच्या एक आठवड्यापूर्वी ही घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: मनोज परब आणि सरदेसाईंना हव्या असणाऱ्या जागा वगळता काँग्रेसची यादी फायनल, लवकरच होणार जाहीर; पाटकरांनी स्पष्टच सांगितलं

Goa Politics: "दाल में कुछ काला है!", सरदेसाईंचा भाजपवर हल्ला; विरोधी पक्षांना दिला '30-10-10'चा फॉर्म्युला

Goa Live News: स्थानिक पातळीवरील राजकारणात आमदार गोविंद गावडे यांना धक्का

Terror Attack: 'लश्कर' आणि 'जैश'चा भयानक कट! काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मोठ्या हल्ल्याचा डाव; गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर

Liquor Seized In Sindhudurg: नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कणकवलीत 7 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; गुजरातच्या दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT