BJP-Congress Dainik Gomantak
महाराष्ट्र

संघ मुख्यालयाजवळ भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते भिडले!

भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) कार्यकर्ते नागपूरमध्ये (Nagpur) हातघाईवर आले असून, त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) कार्यकर्ते नागपूरमध्ये (Nagpur) हातघाईवर आले असून, त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरामध्ये हे दोन्ही पक्षांचे कायकर्ते एकमेकांशी वादावादी करताना पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांकडून कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून काढण्यात आलेला मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाल्याने वादाची ठिणगी पडली. आणि नंतर दोन्ही बाजूकडून धक्काबुक्की झाली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर हा वाद मिटविण्यासाठी अखेर पोलिसांना (Police) मध्यस्थी करावी लागल्याचेही दिसून आले.

देशातील वाढती महागाई आणि अन्य मोदी सरकारच्या (Modi Government) विरोधी मुद्यांवर कॉंग्रेसचे स्थानिक नेते व नगरसेवक बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा जास्त वर्दळीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणी वाहतूकीवर अनेक निर्बंध असतात. मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाहून आपली रॅली घेऊन जाण्याचा हट्ट धरला.

त्यावर स्थानिक भाजप कार्यकर्त्ये आपआपसामध्ये भिडले असल्याचं सांगण्यात आले आहे. परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेता तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाद मिटविण्यासाठी हस्तक्षेप केला आणि तिथल्या परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार पोलिसांची अधिक कुमकही मागविण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरुन मागे पाठविण्यात आले, असल्याचे देखील सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT