Sachin Sawant Dainik Gomantak
महाराष्ट्र

काश्मिरी पंडितांच्या दु:खावर भाजपाने राजकीय पोळ्या भाजल्या - सचिन सावंत

काश्मीरी पंडितांचे प्रश्न आज ही कायम असल्याचं केलं भाष्य

दैनिक गोमन्तक

काश्मिरी पंडितांच्या दु:खावर भाजपाने केवळ राजकीय पोळ्या भाजल्या आहे. ‘काश्मीर फाईल्स’सारखा चित्रपट प्रदर्शित करत अंकीत मिडियाचा वापर केला जात आहे. यामुळे देशभर मुस्लीम द्वेष पसरवला जात आहे. तर राहुल भट या काश्मीरी पंडित तरुणाच्या हत्येसोबत लाखो काश्मिरी पंडितांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नांची चिताही रचली गेली आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त केले. ( BJP burns political beehive over Kashmiri Pandits' pain - Sachin Sawant)

'काश्मीर फाईल्स' या चित्रपटातून निर्मात्यांनी २५० कोटींपेक्षा जास्त कमावले पण काश्मीरी पंडितांचे हात मात्र रितेच राहीले. आज काश्मीरमध्ये जे सुरु आहे. ती कोणत्या चित्रपटाची कथा नसून वास्तविकता आहे. हे चित्रपटाचे प्रमोशन करणाऱ्या पंतप्रधान मोदी व भाजपाने लक्षात घ्यावे.” असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

तर काश्मिरी पंडितांबद्दल भारतीय जनता पार्टीला काहीही देणेघेणे नसून त्यांच्याबद्दलचा कळवळा हा केवळ देखावा होता असं ही ते म्हणाले.“भाजपा समर्थित व्हि. पी. सिंह सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर झाले त्यावेळी भाजपाचेच के. जगमोहन हे राज्यपाल होते. याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या व पलायनास मजबूर केले गेले. तरीही काश्मिरी पंडितांचे दुःख व कलम ३७० चे भांडवल सातत्याने भाजपा करत राहिली.

२०१९ ला ३७० कलम हटवताना काश्मीरमधील दहशतवाद संपेल व पंडितांची घरवापसी होईल असे आश्वासन दिले पण मोदी सरकारच्या काळात दहशतवाद संपलेला नाही तर पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे.” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजप याला कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT