Belagavi Border Dispute Dainik Gomantak
महाराष्ट्र

Belagavi: बेळगाव सीमाप्रश्न तापण्याची शक्यता; महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात जाण्यास बंदी, कोगनोळीत मोठा पोलिस बंदोबस्त

Belagavi border dispute: कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे.

Pramod Yadav

Belagavi border dispute

बेळगाव: सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच, महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नेत्यांच्या प्रवेशावर देखील बंदी घातली आहे. यासाठी कोल्हापूर जवळील कोगनोळी येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तौनात करण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) बेळगावातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला अधिवेशनाचे कारण देत कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच, या मेळाव्यासाठी बेगळगावात येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर देखील बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथे कर्नाटक पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

कर्नाटक सरकारने बेळगावातील पाच ठिकाणी जमावबंदी लागू केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरु केल्याचे सांगितले जात आहे. काही नेत्यांना नजरकैदेत देखील ठेवण्यात आले आहे. कर्नाटक सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप एकीकरण समितीच्या नेत्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नेते बेळगावात दाखल होणार नाहीत यासाठी पोलिस विशेष काळजी घेत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कोल्हापूरातून शिवसेना उद्धव ठाकरे गटातील निघालेल्या नेत्यांना कोगनोळी (Koganoli) येथे आडवण्यात आले. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी आणि तपासणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर गंडभैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

Siolim: शिवोलीवासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीप्रश्न कायमचा सुटणार; आसगाव, हणजूण, वागातोर, बादे, शापोरा परिसरालाही फायदा

Goa Opinion: रामाची ‘फाइल’ कुणी व कशासाठी दिली हे जाहीर होईल का? गोव्यात बहरतोय ‘कंत्राटी मारेकऱ्यां’चा व्यवसाय

SCROLL FOR NEXT