मुंबई: महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना एक धक्कादायक माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. बांग्लादेश आणि म्यानमार येथून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर विशेषत: मुंबईच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे Tata Institute of Social Sciences (TISS) च्या अभ्यासात म्हटले आहे.
संशोधकांना ३००० अवैध पद्धतीने स्थलांतरीत झालेल्यांच्या अभ्यासातून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, अंतरिम अहवालात ३०० जणांच्या सॅम्पलचा समावेश होता. स्थलांतरितांनी धारावी, गोवंडी, मानखूर्द, माहिम पश्चिम, आंबेडकर नगर या ठिकाणांना लक्ष केल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला आहे.
स्थलांतरित बांधकाम किंवा घरकाम अशा अकुशल क्षेत्रात काम करतात. काही राजकीय लोक या स्थलांतरितांचा वोट बँक पॉलिटीक्ससाठी वापर करत असल्याचे या अभ्यासातून म्हटले आहे.
TISS चे प्र-कुलगुरू शंकर दास आणि सहाय्यक प्राध्यापक सौविक मोंडल यांनी केलेला अभ्यास JNU च्या कुलगुरू संतश्री पंडित प्रमुख पाहुणे असलेल्या एका परिषदेत सादर करण्यात आला.
दरम्यान, TISS फॅकल्टी सदस्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची रचना खराब असून, मुंबईतील स्थलांतरित हे बांगलादेशी किंवा रोहिंग्या आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.