Bandatatya Karadkar Dainik Gomantak
महाराष्ट्र

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात? बंडातात्यांचा जाहीर सवाल

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख करत, कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं होत.

दैनिक गोमन्तक

राज्य सरकारने सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाला ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी विरोध दर्शवला आहे. सातऱ्यात (Satara) बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली आहेत. पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे (Supriya Sule), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं होत. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितला तर सिद्ध करु शकतो असंही ते म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली 25 वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत.

अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर (Maharashtra) उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल, असे वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी केल आहे.

बंडातात्या यांनी भाषणात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले. “अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला आहे. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितल. हे सगळं अजित पवारांचंच आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT