Restrictions on Heavy Vehicles on Mumbai Goa Highway: Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; 'या' तारखेपासून अंमलबजावणी

Mumbai Goa Highway: मंत्री रविंद्र चव्हाण दोन तास अडकले वाहतूक कोंडीत

Akshay Nirmale

Restrictions on Heavy Vehicles on Mumbai Goa Highway: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी हे निर्बं घातले असून पुढील रविवारपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

दरम्यान, या महामार्गावरील एका लेनचे काम गणेशोत्सवापुर्वी पूर्ण होणार असून ती लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याचे नुकतेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितले होते.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (पीडब्ल्यूडी) रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी ते स्वतःच वाहतूक कोंडीमुळे दोन तास अडकून पडले होते.

त्यानंतर चव्हाण यांच्या कार्यालयाने संध्याकाळी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये मंत्र्यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांच्याशी चर्चा केल्यानंतर या मार्गावर काही काळ अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणात गणेशोत्सव काळात लोकांना कोणत्याही त्रासाशिवाय पोहोचता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, काकडे यांनी आदेशात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत 23 ऑगस्ट रोजी संबंधितांची बैठक घेण्यात आली होती, त्यामध्ये सणासाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला होता. .

आदेशात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई-गोवा मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT