Balasaheb Thorat Dainik Gomantak
महाराष्ट्र

Balasaheb Thorat: काँग्रेसच्या झेंड्याखाली शरद पवारांनी यावे...

टीका करण्यापेक्षा आमच्या बरोबर एकत्र यावे. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी सर्वजण मिळून एकत्र लढाई करू.

दैनिक गोमन्तक

मुंबई: सद्या काँग्रेसची (Congress)अवस्था एखाद्या जमीन दारासारखी झाली आहे, असे काँग्रेसबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी विधान केले होते. शरद पवारांच्या काँग्रेसबदलाच्या विधानानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी आपला हात पुढे केला आहे. तसेच आता पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे खुले आवाहन शरद पवारांना दिले आहे. त्यामुळे थोरात यांच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले?

बाळासाहेब थोरात मीडियाशी (Media)बोलताना म्हणाले, शरद पवारांनी थेट काँग्रेसमध्ये यावे. तसेच आता काँग्रेसची अवस्था जमीनदारी केलेल्या जमीनदारासारखीच झाली आहे. या पवारांच्या विधानाशी आम्ही असहमत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पवारांच्या या विधानाशी मी असहमत आहे. त्यांच्या अश्या विधानाचा काँग्रेस वर काहीच परिणाम होणार नाही. या नंतर विधानानंतर विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचे प्रयत्न करत असतील तर त्यामध्ये काँग्रेसचे काही नुकसान होणार नाही. पण मला अशी अपेक्षा की, या अश्या विचाराचे जे आहेत. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी जे बांधिल आहेत. त्यांनी अश्या प्रकारची टीका करण्यापेक्षा आमच्या बरोबर एकत्र यावे. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी सर्वजण मिळून एकत्र लढाई करू, असे आवाहन देखील थोरातांनी केलं.

काँग्रेसचे चांगले दिवस :

काँग्रेस हा आपला स्वतः चा एक विचार आहे. काँग्रेसच्या विचारला जर कठीण दिवस आले असतील हे दिसत आहे. कारण समाजामध्ये धार्मिक (Religious)भेदाभेद करणाऱ्याची संख्या वाढत आहे. आपण एका विचाराचे आहोत.आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असे ते म्हणाले.

OBC च्या आरक्षणाचा प्रश्न :

यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षण प्रश्नावर काँग्रेस पक्ष विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलाय त्यावर आम्ही चर्चा करू. सर्वांना सोबत घेऊन चर्चा करूनच आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

मदतीचे ही बोलू :

गेली दोन वर्ष नैसर्गिक संकटातच गेली आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. तेथील पंचनामे अजून चालू आहेत. त्यामुळे पंचनामे झाल्यावरच काय मदत करायची हे ठरवलले जाणारा हे. आज त्यावर बोलणे योग्य वाटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमय्या बोलतात तेच ईडी करते का :

सद्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. किरीट सोमय्या (Kirit Somaiya)बोलतात आणि ईडी तशी काम करते अशी जनतेचे भावना झाली आहे. सामान्य जनता आता वेगळ्या दृष्टीने याकडे सर्वाकडे पाहू लागली आहे. केंद्रीय यंत्रणांना राजकीय लोक वापर करत आहेत. जनताही आता या बाबत सर्व जनता जाणत आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटातील बिहारच्या कामागाराचा मृत्यू

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; विराट कोहलीचा रेकॉर्ड 'फ्लॉप', पण रोहित शर्मा सर्वात यशस्वी फलंदाज!

Viral Video: 'पापी पोटासाठी' जीवघेणा खेळ! अंगावर फटाक्यांची माळ बांधून तरुणाचा स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: शाहिद आफ्रिदीचा 10 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! 'हिटमॅन' ठरणार वनडेचा सिक्सर किंग; मारावे लागणार फक्त 'इतके' षटकार

Malaika Arora Birthday: मलायका अरोरानं गोव्यात साजरा केला 50वा वाढदिवस, वयावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण; अखेर बहिणीने केला खुलासा VIDEO

SCROLL FOR NEXT