Rajesh Tope
Rajesh Tope  Dainik Gomantak
महाराष्ट्र

औरंगाबाद नामांतर विषय ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर नाही : राजेश टोपे

Sumit Tambekar

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतराचा विषय राज्याच्या राजकिय पटलावर बरेद दिवस चर्चेत असून या मुद्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये आरोप -प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत औरंगाबादला आम्ही संभाजीनगरच मानतो म्हणत संभाजीनगर असाच उल्लेख केला होता. मात्र औरंगाबाद नामांतराचा विषय ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर नाही असे आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केल्याने हा वाद पुन्हा उफाळला जाण्याची शक्यता आहे. (Aurangabad renaming is not on Thackeray government's agenda: Rajesh Tope )

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या - त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्यावर विषय नाही, आमच्या पक्षाच्या तर आजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो, असं ते म्हणाले.

गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणं संभाजीनगर लोक म्हणतात. पण मला वाटत नाही की हा आज लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि अन्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपण लक्ष देऊ, असं राजेश टोपे म्हणाले.

14 तारखेला मुंबईत झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर हल्ला चढवला होता. फडणवीस यांनी औरंगाबादचा कायमचा झाला कसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला लगावला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT