Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aurangabad: धक्कादायक! औरंगाबादमध्ये 'एसीपी'ने काढली आपल्याच मित्राच्या पत्नीची छेड, गुन्हा दाखल

पीडीत महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली व ढुमे यांच्यावर सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

औरंगाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी एका महिलेची छेडछाड काढल्याची घटना घडली. याप्रकरणी ढुमे यांच्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर त्यांच्याच मित्राच्या 30 वर्षीय पत्नीची छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला. पीडीत महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली व ढुमे यांच्यावर सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सिटी चौक पोलिसांनी ढुमे यांना याप्रकरणी अटक केली. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली देखील होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT