केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी (In the case of offensive statements) काल राज्यभर राडा झाला, या पडसाद पार दिल्ली पर्यंत उमटले न्यायालयाकडून राणेंना रात्री जामीन (Rane granted night bail by court) मिळाल्यानंतर आता काही अज्ञातांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांच्या घरावर हल्ला केला आहे. हे अज्ञात लोक राणे समर्थक असल्याचे बोलले जात आहे.
राऊत यांच्या सिंधुदुर्गतील घरावर सोडा बॉटल फेकल्याचे समोर येत आहे. चार अज्ञात बाईकस्वारांनी राऊत यांच्या तळगावातील घरावर बॉटल फेकण्यात आल्यानंतर या बाईकस्वारांनी तेथून धूम ठोकली. या हल्ल्यामुळे विनायक राऊत यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे आता विनायक राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हा हल्ला राणे समर्थकांनी केला असल्याचे शिवसैनिकांनी म्हणले आहे.
राणेंच्या अडचणीत वाढ
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरेधात अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने रात्री उशीरा जामीन दिल्यानंतरही राणेंच्या अडचणी संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. कारण नाशिकच्या साइबर पोलिसांनी राणेंना 2 सप्टेंबरला हजर राहण्याची सूचना केली आहे. ते हजर न राहिल्यास त्यांना पुन्हा अटक करण्यात येऊ शकते. असे नाशिक पोलिसांनी म्हणले आहे.
राणेंना मिळालेला जामीन म्हणजे सरकारला चपराक : चंद्रकांत पाटील
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकेनंतर त्यांना रात्री उशीरा न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, नारायण राणेंना मिळालेला जामीन म्हणजे राज्य सरकारला मोठी चपराक आहे. पोलिसांच्या आणि भाडोत्री गुंडांच्या जोरावर राज्य सकरकारचे काम सुरु आहे. राणे यांची जन अशिर्वाद यात्रा सुरु राहणार आहे. असे सांगत सिंधुदुर्गात लावण्यात आलेल्या संचारबंदीवरही त्यांनी अक्षेप घेतला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.