Minister Anil Parab Dainik Gomantak
महाराष्ट्र

ED ची नोटीस मिळणार अशी अपेक्षा होतीच: अनिल परब

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या प्रकरणावरुन केंद्र सरकावर टीका केल्याचे पहायला मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. याविषयावर बोलताना अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ही नोटीस येणार असल्याची अपेक्षा होती असे सांगितले आहे. तसेच ही नोटीस कशासाठी आली हे माहिती नसुन, नोटीसमध्ये सविस्तर माहिती नसुन फक तपासाचा भाग म्हणून ईडीने आपल्याला कार्यालयात बोलवले असल्याची माहीती अनिल परब यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीचे तीन नेते हे सध्या ईडीच्या रडारवर असल्याचे समजते आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिल्याचे समजते आहे. तसेच अनिल परब यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांना देखील नोटीस येऊ शकते असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. अनिय परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, या नोटीसचा कायदेशीर अभ्यास करुन आपण त्यावर बोलू. त्यामुळे आता येणाऱ्या काळात अनिल परब यांच्यावर ईडीकडून काही कारवाई केली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनिल परब यांना ही नोटीस आल्याची माहिती देताना, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र" असे म्हणत संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT