Amir Khan- Rajkumar Hirani Dainik Gomantak
महाराष्ट्र

Amir Khan: 'पीके'नंतर आमिर खान अन् राजकुमार हिराणींची जोडी पुन्हा जमणार

Amir Khan: '3 इडियट' आणि 'पीके' या चित्रपटांच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

Amir Khan: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका आमिर खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो कोणत्या चित्रपटात दिसला नाही मात्र आत्ता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, दिग्दर्शिक राजकुमार हिराणी आणि आमिर खान पून्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हा त्याचा चित्रपट बायोपिक असून चाहत्यांमध्ये या बातमीने उत्साह संचारला आहे. इतकेच नाही तर आमिर खान फक्त याच नाही तर मिळालेल्या माहीतीनुसार तो एकत्रच पाच चित्रपटांची घोषणा करणार आहे.

दरम्यान, याआधी आमिर खान आणि राजकुमार हिराणी यांनी '3 इडियट' आणि 'पीके' या चित्रपटांच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. महत्वाचे म्हणजे, या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.

आमिर खानचा 2016 मध्ये आलेला दंगल हा चित्रपट संपूर्ण जगभरात गाजला होता. त्यानंतर मात्र या सुपरस्टारला बॉक्स ऑफीसवर म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. 2022 मध्ये आलेल्या लाल सिंह चड्ढा ला मोठ्या अपय़शाला सामोरे जावे लागले होते. लाल सिंग चड्ढा फल्ॉफ झाल्यानंतर आमिरने ब्रेक घेतल्याचे दिसून आले होते.

अभिनेता म्हणून त्याने कोणत्याही चित्रपटाची अनाऊंसमेंट केली नाही मात्र प्रोडक्शन हाऊसचे काम पाहत असल्याचे म्हटले जात आहे. 'इंडिया हैराल्ड' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आमिर प्रोड्यूसर म्हणून एकदम चार चित्रपटांची घोषणा करु शकतो.

आमिर एका स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवत आहे,ज्यामध्ये फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. याशिवाय तो 'जय जय जय हे' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवत आहे. यात फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहे.

दरम्यान, राजकुमार हिरानी सध्या शाहरुख खान सोबत डंकी या चित्रपटाच्या शूटिंगच्या तयारीत आहे. आता आमिर खान कोणत्या चित्रपटाची घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT