All temples in Maharashtra are open from today Dainik Gomantak
महाराष्ट्र

दीड वर्षानंतर महाराष्ट्रातील मंदीरं खुली; भक्तांचा आनंद द्विगुणीत

कोरोनाच्या (Covid-19) महामारीच्या संकटामुळे 2 वर्षांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच मंदिरे (Temples) बंद होती.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या (Covid-19) महामारीच्या संकटामुळे 2 वर्षांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच मंदिरे (Temples) बंद होती. पण आजपासून महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुली करण्यात आली आहेत. पुण्यातील प्रसिद्ध असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर भाविकांसाठी पहाटे 5 वाजता खुले करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. पण यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन बघायला मिळाले.

तसेच एकादशीला देशातून विठ्ठल भक्त आपली वारी पोहचवत असतात. त्या भक्तांना कोरोनामुळे आपली वारी करता आली नाही. आता मंदिर समितीने सर्व भक्तांना दिलासा देत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेता येणार. दीड वर्षांनंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आज उघडले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराला टस्थापनेच्या निमित्ताने तुळशीच्या पाना फुलांची आरास करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

कोल्हापुरात, प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सवाचा पहिल्या दिवसापासून म्हणजेच आज पासून खुले करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेले सहा महिने हे मंदिर बंद होते. दर्शनासाठी आजपासून ऑनलाईन बुकिंग सुरु झाली आहे. दर्शनासाठी मंगळवारी 11 वाजता लिंक खुली केली 10 तासातच 30 हजार भाविकांनी दर्शनासाठी नोंदणी केली. महालक्ष्मी मंदिराचे दोन द्वार आज खुले करण्यात आले आहे.

शिर्डीच्या साई बाबांचे भक्त एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर आजपासून त्यांचे दर्शन घेऊ शकतील. आज पासून शिर्डीचे साई बाबांचे मंदिर खुले करण्यात आले आहे. दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे शिर्डी मंदिराच्या ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. आज पहाटे काकड आरतीने शिर्डीच्या साई बाबांचे मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या शिर्डीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT