अजित पवार  Dainik Gomantak
महाराष्ट्र

बँक घोटाळ्यात ईडीची करवाई अजित पवार यांच्या जवळच्या मित्राचा साखर कारखाना जप्त

ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात एक मोठा साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीने साखर कारखान्याच्या मालकाचे नाव उघड केले नाही

दैनिक गोमन्तक

ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात एक मोठा साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीने साखर कारखान्याच्या मालकाचे नाव उघड केले नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही साखर कारखान्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे मित्रअसल्याचे सांगितल जात आहे.परंतु याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

सन 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यसह इतर 70 जणांविरूद्ध एफआयआर दाखल केला होता, परंतु महानगर दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. 23 सप्टेंबर 2019 रोजी पोलिसांनी 5 हजार कोटींच्या घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांचे नाव घेतले होते. पुरावा नसल्यामुळे मुंबई पोलिसांनी हे प्रकरण बंद केले.

परंतु आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील मुंबई पोलिसांच्या बंदीच्या अहवालाला ईडीने विरोध केला असून यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील प्रमुख नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर अहवालाची प्रत मागितली होती आणि पोलिसांच्या क्लोजर अहवालाला आव्हानही दिले होते. त्यानंतर ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

हा घोटाळा सुमारे पाच हजार कोटींचा आहे . 2019 मध्ये ईडीने कथित गैरव्यवहाराबद्दल अनेक लोकांचे जबाब नोंदवले होते.मात्र मुंबई पोलिसांना या प्रकरणात काहीही सापडले नसल्यामुळे कोणतीही प्रगती झालेली नव्हती.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आज ईडीने एक साखर कारखाना जप्त केली असून आता पर्यंत ईडीने साखर कारखान्याच्या मालकाचे नाव उघड केले नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही साखर कारखानदारी अजितदादांच्या जवळची असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांना पुन्हा ईडीच्या रडारवर आणले आहे.

अगोदरच राष्टवादी कांग्रेसचे अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे आणि त्यात आता हे प्रकरण समोर आल्याने अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढ होण्याची श्यक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT