Legislative Assembly

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

अध्यक्षांना नमस्कार नाही, मुख्यमंत्र्यांची खुर्चीतर सोडा... अजित दादांनी आमदारांची घेतली शाळा

अजित पवार यांनी दोन लगावले, चार घेतले, पण एकूणच अधिवेशन व्यवस्थित पार पडले, असे संजय राऊत यांनी म्हटले.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती. ही जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली, अशी कौतुकाची पावती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिवेशनावर पूर्ण लक्ष आणि नियंत्रण होते.

अधिवेशनकाळात (Convention) विधानसभेचे (Legislative Assembly) कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिसत होती. त्यांनी टोले घेत, टोले देत ही जबाबदारी निभावली. अजित पवार यांनी दोन लगावले, चार घेतले, पण एकूणच अधिवेशन व्यवस्थित पार पडले, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले. त्यांना सध्या काही निर्बंध आणि पथ्यं पाळावी लागत आहेत. मात्र, हे निर्बंध लवकरच दूर होतील आणि मुख्यमंत्री पुन्हा कामाला लागतील, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.

आतादेखील ते काम करतच आहेत. कोरोनाच्या काळातही मुख्यमंत्र्यांनी घरी बसून संपूर्ण परिस्थिती हाताळली होती. तेव्हा मंत्रीही मंत्रालयात जात नव्हते, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशात अत्तर व्यापाऱ्याकडे सापडलेल्या पैशांच्या घबाडाच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी टिप्पणी केली. राजकारणात आजकाल प्रत्येकजण असे महागडे अत्तर घरी ठेवत असतो. दुसऱ्यांच्या घरी अत्तर मिळाले तर लगेच टीका केली जाते. मात्र, आता पंजाब, उत्तर प्रदेश आणि गोव्यात काय होणार, ते दिसेलच. त्याठिकाणी भाजप (BJP) याच अत्तराचा वापर करणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मतदारसंघातील लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी मिळते. तेव्हा आपण कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही, याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केले.

तुम्ही सभागृहात प्राण्यांचे आवाज काढता तेव्हा तो या मतदारांचा विश्वासघात आणि अपमान ठरतो. तुम्ही सभागृहात आवाज काढता किंवा टवाळी करता ते पाहून मतदारांना काय वाटत असेल याचा विचार आमदारांनी करावा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मंगळवारी सभागृहातील नवख्या आमदारांना कानपिचक्या दिल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT