AIMIM Imtiaz Jaleel sends Iftar invitation to Raj Thackeray before rally in Aurangabad  Dainik Gomantak
महाराष्ट्र

AIMIMने औरंगाबादेत सभेपूर्वी राज ठाकरेंना पाठवले इफ्तारचे निमंत्रण, मनसेसोबत युतीवर भाजपचे मौन

ठाकरे साहेब आपण एकत्र बसू, यातून देशात चांगला संदेश जाईल, खासदार इम्तियाज जलील

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या रविवारी मशिदींतील लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून औरंगाबाद येथे होणाऱ्या मेळाव्यापूर्वी, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी भविष्यात संभाव्य युतीसाठी भाजपशी कोणतीही चर्चा सुरू असल्याचे नाकारले आहे. दरम्यान, वृत्तानुसार, औरंगाबादचे AIMIM खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित करून शहरात शांतता आणि सौहार्दाचा संदेश दिला. (Raj Thackeray Rally)

पुण्यात रात्रभर मुक्काम केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आज शनिवारी सकाळी औरंगाबादला रवाना होणार आहेत. ३ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर त्यांची रॅली होत आहे. मनसेच्या या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. परंतू ही सभा घेण्यासाठी पोलिसांनी 15 अटी घातल्या आहेत.

महाराष्ट्रात भाजप-मनसे युतीच्या अटकळी दरम्यान, राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले, 'राजकारणात काहीही होऊ शकते, परंतु आतापर्यंत युतीसाठी भाजपशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे,' नितीन सरदेसाई यांनी सांगतिले. तर दुसरीकडे 'काही चर्चा सुरू आहे की नाही हे मला माहीत नाही,' असे मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

या संपुर्ण चर्चेदरम्यान "मनसेसोबत युतीसाठी कोणतीही चर्चा किंवा कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाह यासर्व काही अटकळ आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, 'भाजप आणि मनसेची युती देशातील जनता ठरवेल. राजकारण्यांच्या हाती काहीच नाही.' आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रॅलीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, 'त्यांनी (राज ठाकरे) किती वेळा भूमिका बदलली, हा पीएचडीसाठी चांगला विषय आहे,'असे खोचक वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT